आज महाविद्यालयामध्ये अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत समाजशास्त्र विभाग व महिला सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "महिला सक्षमीकरण : स्त्री- पुरुष समानता" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथील मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका नूतन पाटील मॅडम प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या व्याख्यानात "महिला सक्षमीकरण : स्त्री - पुरुष समानता" या विषयावर आपले बहुमोल असे मत व्यक्त केले. समाजामध्ये असलेले स्त्री- पुरुष समानतेबद्दलचे जे चित्र आहे, त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले, व स्त्री - पुरुष समानता हे टिकून राहिले पाहिजे, असे सुद्धा त्यांनी सांगितले. आजच्या आधुनिक युगामध्ये समाजामध्ये स्त्रीला असणारे स्थान कशा पद्धतीचे आहे, हे सुद्धा त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले. यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश देसाई सर यांनी आपल्या अध्यक्षिय मनोगतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये स्त्री - पुरुष समानता कशी आहे, याचे सुद्धा चित्र प्रकट केले. भारताचा सुद्धा स्त्री-पुरुष समानतेमध्ये जगामध्ये 135 वा क्रमांक आहे, हे सुद्धा सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख व इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता गित्ते मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रेश्मा देवरे मॅडम यांनी केले. आणि शेवटी कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका प्रियांका कुंभार मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय योजनेचे प्रमुख डॉ. तुकाराम राबाडे सर, सायन्स विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब कोकरे सर महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
|
Comments
Post a Comment